Tuesday 19 July 2011
मोगरीगंध
गंध तुझ्या मोगरीचा
माझ्या मनीफुमतसे
गंधवेड़ा जीव माझा
भेटीलागी झुरतसे
श्यामवेड़्या राधिकेचे
लागले का माला पिसे..?
गंध तुझ्या मोगरीचा
श्वासातुनी भरे उरी
सोड़विली फुले जरी
केसातुनी अड़कलेली
जीव गुंतलेला जीवी
सोड़वावा कासा परी..?
गंध तुझ्या मोगरीचा
दाही दिशी सांजल्याली
तुझ्यासाठी मनामधे
कळी कळी जपलेली
स्पर्षाविना सांग तुइया
कशी पुन्हा उमलावी...?
- लीनता.
Subscribe to:
Post Comments (Atom)
खूप आवडली ही कविता. याचे गीतही छान होईल.
ReplyDelete