माझ्या मनीच्या उंबरी
शब्द येऊन थांबती
कितीतरी क्षण असे
कोरे जसेच्या तसे
गोठवुन ठेवले मी
तुझ्यासह जगायचे
- लीनता.
शब्द येऊन थांबती
जीवनीचे क्षण किती
चित्ररुप पावती
कधी पहाटे अरुण
शांत नीरव या राती
येती स्वप्नांच्या वराती
वाट तुझिच पहात
कधी ऊगवे पहाट
गर्द झाड़ींची कमान
शुभ्र धुक्यातील वाट
पावसाच्या सरी कधी
चिंब होऊनिया गाती
भिजूनही शब्द माझे
कोरड़ेच राहती
कितीतरी क्षण असे
कोरे जसेच्या तसे
गोठवुन ठेवले मी
तुझ्यासह जगायचे